Tuesday, 3 October 2017

मराठी इंटरनेट विश्वातील बौध्द धम्माच्या वृध्दीसाठी...

जयभीम सन्मित्रहो,

ह्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे. ह्या भारतभूमीमध्ये जरी बौध्द धम्माचा उगम झालेला असला तरी सुध्दा काही काळानंतर त्याची ज्या पध्दतीने पीछेहाट झाली, त्याचा परिणाम आज आपल्याला बघायला मिळतो आहे. पूर्वी बौध्द धम्म, संस्कृती आणि साहित्य या सर्वांनी प्रफुल्लीत असलेल्या ह्या देशाला या सर्व गोष्टींसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावे लागत आहे. याशिवाय भाषिक इंटरनेट विश्वामध्ये तर त्याचे अस्तित्वच नाही असे दिसते. हि पोकळी भरून निघावी यासाठी आम्ही गेल्या ४ वर्षांच्या पासून इंटरनेट वर बौध्द धम्माच्या बाबतीत जास्तीत जास्त माहिती उपलब्ध असावी यासाठी आम्ही विविध मार्गांनी प्रयत्नशील आहोत. 

१. फेसबुक वरील पान : 

जवळपास मागील ६ वर्षांच्या पासून आम्ही धम्म तथागतांची मौल्यवान शिकवण  ह्या नावाने फेसाबुकर पान सुरु केले होते, ज्याला सामाजिक माध्यमाच्या पातळीवरून बरा प्रतिसाद मिळाला. ह्या पानाने अनेक महत्वाच्या गोष्टी आणि माहिती लोकांच्या पर्यंत तर पोहोचविल्याच परंतु यासोबतच लोकांना जोडण्याचे महत्वपूर्ण कार्य ह्या फेसबुक पानाने केले आहे. 


२.ब्लॉग : 

फेसबुक वरील पानाचा आवाका हा मर्यादित आहे, त्याच्या द्वारे प्रसारित करण्यात येणारी माहिती हि त्याच्याशी न जुडलेल्या लोकांच्या पर्यंत पोहोचू शकत नाही. ह्या मर्यादेच्या पलीकडे जाण्यासाठी आम्ही इंटरनेट वर बौध्द जीवन मार्ग नावाने ब्लॉग लिहायला सुरुवात केलेली होती. त्याला गेल्या चार वर्षांच्या त्याच्या स्थापणे पासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायला लागला. अनेक लोकांच्या पर्यंत ह्या ब्लोगने आमचा संदेश पोहोचविण्यासाठी मदत केली. ह्या ब्लोगवर आजघडीला जवळपास ७० विविध विषयांवर उत्तम दर्जाचे लेख लिहिल्या गेलेले आहेत.


३. वेबसाईट : 

आमच्या द्वारे प्रसारित करण्यात येणाऱ्या संदेशाला अधिक व्याप्त प्रमाणात प्रसारित करण्यासाठी तसेच त्यामध्ये विविध गोष्टींचा समावेश व्हावा यासाठी  बोधीशाला  ह्या नावाने आता नवीन वेबसाईट सुरु करीत आहोत. यामध्ये आपल्याला खालील गोष्ठी उपलब्ध करण्यात येईल.

  •  शिकवण व त्यांचे उपदेश..
  • बुद्धकालीन कथा
  • बौध्द धम्मावर निबंध
  • बौध्द धाम्मावरील शंकांचे निरसन
  • महत्वाची पुस्तके
  • नियतकालिके
  • धम्माचे विविध पैलू
  • ब्लॉग
  • विविध

सदर वेबसाईट आपल्याला हिंदी मध्ये सुध्दा लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल


४. पुस्तक : 


आमच्या ब्लोगवर लेखन करणारे पियुष खोब्रागडे यांनी ब्लॉग लिहित असतांनाच एक पुस्तक लिहिले आहे ज्याचे नाव आहे, भगवान बुद्धांची धम्मदेसना हे पूर्वीच्या अनेक लेखकांनी टाळलेल्या तसेच त्यांच्या द्वारे संभ्रमात टाकलेल्या अनेक विषयांच्या बाबतीत २२५ पानांच्या ह्या पुस्तकामध्ये बौध्द धम्माच्या विविध अंगांचे योग्य प्रकारे स्पष्टीकरण देण्यात आले आहे - ज्याद्वारे मराठी बौध्द समाज संभ्रमावस्थेत आहे. तसेच स्वतःच्या कमी आकलन शक्तीमुळे बौध्द धम्मावर विविध माध्यमांतून दिका करणाऱ्या लोकांच्या अनेक टीकांचा योग्य तो समाचार सुध्दा घेण्यात आला आहे. मराठी बौध्द समाजाला जास्त परिचित नसणाऱ्या बोधिसत्व संकल्पना (ज्या विषयावर स्वतःच्या कमी आकलन शक्ती किंवा कट्टर मान्यतेमुळे टीका सुध्दा करतात)चतुर्ब्रह्मविहार यांच्या सारख्या विषयावर प्रकाश टाकलेला आहे. पुस्तकाची भाषा अत्यंत चांगली असून त्यामुळे पुस्तक वाचतांना उत्सुकता निर्माण होते. पुस्तकामध्ये अनेक ठिकाणी अनुवादांचा सुध्दा वापर करण्यात आला आहे. त्यांची भाषा सुध्दा अतिशय सुंदर आहे. हे पुस्तक विविध विषयांना पाहण्याचा वेगळ्या प्रकारचा दृष्टीकोन प्रदान करते.  भारतीय बौध्द समाजाची परिस्थिती पाहून निश्चितच असे मत बनते किहे पुस्तक प्रत्येकांनी वाचायलाच हवे. 

५. नियतकालिके :


वरील सर्व कार्यक्रमांच्या यशस्वी जडणघडणी नंतर भविष्यामध्ये नियतकालिक प्रकाशित करण्याचा आमचा मानस आहे (ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वरूपामध्ये). परंतु त्यासाठी मनुष्य संसाधानाची आवश्यकता आहे. ह्या स्वरूपांच्या मधून धम्माचा प्रचार करण्यासाठी आम्ही कोणाकडेही पैशांची मागणी करीत नाही. आपल्या मिळकती मधील काही भाग हा धम्म कार्यासाठी लागावा यासाठी आम्ही जमेल तितके कार्य करीत असतो. परंतु जेव्हा कार्याचा आवाका वाढतो, तेव्हा ते पूर्णत्वास नेण्यासाठी पुरेशा मनुष्य संसाधानाची आवश्यकता भासत असते. त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी स्वयंसेवक स्वेच्छेने हे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी कोणत्याही स्वरूपामध्ये मदत करीत असतील तर आपले स्वागत आहे. हि मदत कोणत्याही स्वरूपात असू शकते : 

१. तुम्ही आपले लेख पाठवू शकता.
२. लेखांची प्रुफ रीडिंग 
३. टायपिंग
४. पब्लिशर software मध्ये त्याची मांडणी करू शकता.
५. याशिवाय अन्य काहीही..

६. आमची संकेतस्थळे : 


२. बौध्द जीवन मार्ग - इंटरनेट वरील ब्लॉग (www.Buddhistsofindia.blogspot.in)

३. बोधीशाला - नवीन वेबसाईट (www.Bodhishala.in)

४. भगवान बुद्धांची धम्म देसणा - पियुष खोब्रागडे







No comments:

Post a Comment